भारताच्या सूडाची कहाणी सांगणारा ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २०१८ मधला सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटला एक महिना पूर्ण झालाय आणि या चित्रपटानं महिन्याभरात बक्कळ कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : असा झाला ‘How’s the Josh?’ या डायलॉगचा जन्म…

जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर महिन्याभरात २१४.५६ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या पाच दिवसांत ५० कोटींची कमाई करून या चित्रपटानं अनेक सुपरहिट चित्रपटांचे विक्रम मोडले होते.

वाचा : जाणून घ्या ‘उरी’ सिनेमाच्या निर्मितीमागील ‘पाकिस्तान कनेक्शन’

विकीसोबत यामी गौतम, परेश रावलदेखील प्रमुख भूमिकेत या चित्रपटात पहायला मिळत आहेत. आदित्य धार या चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uri the surgical strike one month box office collection
First published on: 12-02-2019 at 16:13 IST