गोड निरागस, सालस, देखणी अभिनेत्री अशी विशेषणं ऐकली की उर्मिला कानिटकर- कोठारे हिचं नाव चटकन तोंडी आल्या शिवाय रहात नाही. दुनियादारी सिनेमात साकारलेली मिनू काहीशी तशीच होती. मात्र प्यारवाली लव्ह स्टोरीने तिच्या चाहत्यांना जोरदार झटकाच दिला. तुफान, टॉमबॉयसारख्या नंदिनीने प्रेक्षकांची झोपचं उडवली. आता तर उर्मिला आपल्याला भन्नाट रुपात दिसणार आहे. इरॉस इंटरनॅशनल निर्मिती असलेला ‘गुरु’ सिनेमा २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. या सिनेमाचं दिग्दर्शन संजय जाधव करत असून या चित्रपटात उर्मिलाची नुसतीच वेगळी भूमिका नाहीए तर तिचा हटके मेक ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंकुश चौधरीच्या ‘सनग्लासेस’ च्या स्टाईलची जशी सगळीकडे चर्चा आहे तशीच उर्मिला तिच्या जबरदस्त लुकमुळे रॉकऑन झालीये. तिने ‘गुरु’ सिनेमात साकारलेली ‘मँगो डॉली’ तिच्या चाहत्यांनी यापूर्वी नक्कीच पहिली नसेल. ‘गुरु’ मधील तिचा रावडी लुक तिने आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपैकी चाकोरी बाहेरचा असेल यात शंका नाही. तिच्या तोंडी असलेले गावरान संवाद, भडक रंगाच्या घागरा चोळीचा पेहराव आणि एकंदरच तिने वठवलेली भूमिका पाहून वाह ‘गुरु’ म्हणतच प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर पडतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

More Stories onगुरुGuru
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urmila kanitkar as mango dolly in guru
First published on: 04-12-2015 at 14:51 IST