अभिनेत्री उर्वशी रौतेला ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. सध्या उर्वशी ही ऑस्ट्रेलियाला पोहोचली असून तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे. अनेक रोमँटिक कविता आणि करवा चौथ याचा संबंध क्रिकेटपटू ऋषभ पंतशी जोडला जात आहे. ऋषभचे चाहतेही यावरुन तिला ट्रोल करताना दिसत आहे. मात्र आता नुकतंच उर्वशीने या सर्व ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उर्वशी ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. नुकतंच उर्वशीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने स्वतःची तुलना इराणी महिलेशी केली आहे. त्याबरोबरच तिने माझी कोणीही काळजी घेत नाही आणि मला कोणीही पाठिंबा देत नाही, अशी खंतही व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : ऋषभ पंतसाठी भर रस्त्यात भांडल्या उर्वशी आणि ईशा नेगी? पाहा Viral Video

इराणमध्ये महसा अमिनी या २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. योग्य पद्धतीने हिजाब परिधान न केल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तिला इराणधील ‘मोरालिटी पोलिसां’नी अटक केली होती. अटकेच्या कारवाईनंतर कोमामध्ये गेल्यामुळे या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटीही या प्रकरणी भाष्य करत आहेत. नुकतंच उर्वशीने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

यावेळी उर्वशी म्हणाली, “आधी इराणमध्ये महसा अमिनी आणि आता भारतात…माझ्याबरोबरही असेच काहीसं घडत आहे. ते मला धमकवण्याचा, माझ्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी कोणीही काळजी करत नाही. तसेच मला कोणी समर्थनही देत नाही. एक सशक्त स्त्री ती असते जी गंभीरता आणि प्रेम हे मनापासून अनुभवते. तिच्या हसण्याप्रमाणे ती रडते. ती मृदु आणि ताकदवान दोन्हीही असते. तसेच ती व्यावहारिक आणि आध्यात्मिकही असते. ती जगाला दिलेली देणगी आहे.”
आणखी वाचा : ‘शिवराज अष्टका’तील पाचव्या चित्रपटाची अखेर घोषणा, ‘या’ मोहिमेवर असणार आधारित

दरम्यान उर्वशीने स्वत:ची तुलना अमिनीबरोबर केल्याने अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. इराणमध्ये सुरु असलेली हिजाबविरोधी चळवळ ही एक गंभीर समस्या आहे. याचा इराणी महिलांना खूप त्रास होत आहे, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urvashi rautela compare her with mahsa amini says first in iran and now in india it is happening with me nrp
First published on: 13-10-2022 at 13:28 IST