बॉलिवूडमधल्या तारे-तारकांना असलेल्या आलिशान गाड्यांचं वेड काही नवं नाही. त्यांच्याकडे असलेल्या अशा आलिशान गाड्यांची नेहमीच चर्चा होत असते. नुकतीच उर्वशी रौतेला तिच्या आलिशान गाडीमुळे चर्चेत आली आहे. तिनं स्वत:साठी २ कोटींची आलिशान कार खरेदी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उर्वशीचा ‘हेट स्टोरी ४’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. पण, काहीही असलं तरी उर्वशी आपल्या कामावर मात्र खूपच समाधानी होती आणि याच आनंदातून तिनं स्वत:ला २ कोटींची मर्सडिज भेट केल्याचं बोललं जात आहे. उर्वशीला असलेलं आलिशान गाड्याचं वेड लपून राहिलेलं नाही. उर्वशीनं बॉलिवूडमध्ये म्हणावा तसा जम अजूनही बसवला नाही, तिच्या वाट्याला आलेले मोजके चित्रपटही तितकेसे बॉलिवूडमध्ये चालले नाहीत. पण, ज्यावेळी तिनं इण्डस्ट्रीत करिअरला सुरुवात केली होती त्यावेळी तिनं स्वत:साठी रेंज रोव्हर खरेदी केली होती.

उर्वशीनं आतापर्यंत ४ आलिशान गाड्या खरेदी केल्या आहेत. मर्सडिज एस क्लास ही तिनं खरेदी केलेली चौथी आलिशान गाडी आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urvashi rautela gifts herself rs 2 crore mercedes
First published on: 19-04-2018 at 13:32 IST