अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा आज वाढदिवस आहे. तिने सनी देओलच्या ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ग्रेट ग्रँड मस्ती, सनम रे, हेट स्टोरी ४, पागलपंती, वर्जिन भानुप्रिया असा चित्रपटांतही तिनं काम केलं आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या बर्थडे प्लॅन्सबद्दल सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने सांगितलं की शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तिला जास्त काही प्लॅन्स करता आले नाहीत. तिने आपला भाऊ आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत आपला वाढदिवस साजरा केला. शूटिंगच्या सेटवरही सगळ्यांसोबत छोटंसं सेलिब्रेशन झालं आणि आता ती घरच्यांसोबतही वाढदिवस साजरा करणार आहे.

तुला जर कोणत्या सेलिब्रिटीला तुझ्या वाढदिवसाला बोलवायचं असेल तर कोणाला बोलवायला आवडेल असा प्रश्न तिला विचारला असता तिने सांगितलं की मला एलॉन मस्क, व्लामिदिर पुतिन आणि शाहरुख खानला पार्टीला बोलवायला आवडेल. तसंच तिने झेंडाया या हॉलिवूड अभिनेत्रीलाही बोलवायला आवडेल असं म्हटलं आहे.

या मुलाखतीच्या वेळी तिने आपल्या लहानपणीच्या वाढदिवसाच्या आठवणींनाही उजाळा दिला. वाढदिवसासाठी एक महिना आधीपासूनच खरेदीला सुरुवात करायचो आणि मनासारखा ड्रेस मिळेपर्यंत भरपूर दुकानं हिंडायचो असंही तिनं सांगितलं. तसंच सगळ्यात स्पेशल गिफ्ट कोणतं असं विचारलं असता तिने आई बाबा हेच सगळ्यात स्पेशल गिफ्ट आहेत कारण ते माझ्या कायम पाठीशी असतात. इतके चांगले आईवडील मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते असंही ती म्हणाली.

उर्वशी सध्या अभिनेता रणदीप हुडासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या चित्रपटात काम करत आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urvashi rautella said she wants to invite elon musk and shahrukh khan for her birthday party vsk
First published on: 25-02-2021 at 17:20 IST