अब्बास – मस्तान यांच्या ‘नकाब’ चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री उर्वशी शर्मा आणि तिचा पती अभिनेता सचिन जोशी यांना पुत्ररत्न झाला. २६ नोव्हेंबरला उर्वशीने गोंडस बाळाल जन्म दिला. काल ती आपल्या बाळासह रुग्णालयातून घरी परतली. उर्वशी आणि सचिनचे हे दुसरे बाळ असून, त्यांना तीन वर्षांची समायरा ही मुलगीही आहे.

वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम दिशा वकानीच्या घरी बाळाचं आगमन

रुग्णालयातून घरी परतताना सचिन – उर्वशीने आपल्या दोन्ही मुलांसह फोटोग्राफर्सना पोज दिली. यावेळी सचिन आपल्या तान्हुल्याची काळजी घेण्यात व्यस्त होता. तर उर्वशीच्या चेहऱ्यावर तिच्या नवजात बालकाच्या जन्माचा आनंद ओसंडून वाहत होता. ऑक्टोबरमध्ये पुण्यात उर्वशीच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला होता. यावेळी दोघी मायलेकींनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

वाचा : राणा डग्गुबती साकारणार राजेश खन्ना यांची ‘ही’ अजरामर भूमिका

‘नकाब’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या उर्वशीने ‘थ्री’,’खट्टा मीठा’,’आक्रोश’,’चक्रधर’ या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. पण उर्वशीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यामुळे तिचे सिनेकरिअर फार झेप घेऊ शकले नाही. यादरम्यान तिची ओळख सचिनशी झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २०१२ मध्ये सचिनशी लग्न केल्यानंतर कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून तिने चित्रपटसृष्टीपासून थोडे दूर राहणे पसंत केले. यानंतर ‘एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर आगमन केले होते. या मालिकेत १९७० ते ८० च्या दशकातील मुंबईतील डॉनची भूमिका तिने साकारली होते. पण या मालिकेचे अधिकतर चित्रीकरण हैदराबादमध्ये होत होते. यामुळे आपल्या चिमुकलीकडे लक्ष देणे आणि फार काळ तिच्यापासून लांब राहणे शक्य नसल्यामुळे तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

https://www.instagram.com/p/BcHR2O_BeuE/

https://www.instagram.com/p/BcHdIkOBzTP/

View this post on Instagram

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

A post shared by Urvashi Sharrma (@urvashiamrrahs)