scorecardresearch

“धार्मिक छळ सुरूच आहे”; काश्मिरी पंडितांच्या पलायनाबाबत अमेरिकन अभिनेत्रीचे ट्विट

मिलबेनने ट्विटमध्ये ‘पलायन दिवस’ म्हणत माझ्या प्रार्थना काश्मिरी पंडितांसोबत आहेत असे म्हटले आहे.

USA national singer Mary Millben tweet Kashmiri Pandits from the Valley abn 97
(फोटो सौजन्य-मेरी मिलबेन/ ट्विटर)

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या धमक्या आणि हत्यांमुळे १९९० मध्ये खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे पलायन झाल्याचे म्हणत, अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेनने याबाबत भाष्य केले आहे. माझ्या प्रार्थना काश्मिरी पंडित समुदायासोबत आहेत, कारण अनेक जण अजूनही त्यांचे प्रियजन, घरे गमावून शोक व्यक्त करत आहेत, असे मिलबेनने म्हटले आहे. विस्थापित काश्मिरी पंडित दरवर्षी काश्मीर खोर्‍यातून जगाच्या विविध भागांमध्ये समुदायाच्या पलायनाच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रम आयोजित करतात. मिलबेनने ट्विटमध्ये ‘पलायन दिवस’ म्हणत माझ्या प्रार्थना काश्मिरी पंडितांसोबत आहेत असे म्हटले आहे.

पलायन दिवसाचे आयोजन

विस्थापित काश्मिरी पंडित दरवर्षी काश्मीर खोर्‍यातून जगाच्या विविध भागांमध्ये समुदायाच्या पलायनाच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रम आयोजित करतात. बुधवारी भारतात, १९९० मध्ये पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांच्या धमक्या आणि हत्येमुळे १९९० मध्ये खोऱ्यातून त्यांच्या समुदायाच्या सदस्यांनी पलायन केल्याबद्दल त्यांनी ‘पलायन दिवस’ आयोजित केला होता.

अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका मिलबेनने एका ट्विटमध्ये तिच्या प्रार्थना काश्मिरी पंडित समुदायासोबत आहेत असे म्हटले आहे. “जगभर धार्मिक छळ सुरू आहे. आज आपल्याला पलायन दिवसाची भीषणता आठवते….जेव्हा काश्मिरी पंडितांना काश्मीरमधील इस्लामी दहशतवाद्यांच्या नरसंहारामुळे पळून जावे लागले. माझ्या प्रार्थना काश्मिरी पंडित समुदायासोबत आहेत कारण अजूनही अनेक लोक त्यांच्या प्रियजन, घरांसाठी शोक करत आहेत,” असे मिलबेनने म्हटले आहे.

हत्याकांड आजही सुरू

एक जागतिक व्यक्तिमत्व म्हणून मी नेहमीच पाठिंबा देईल. कारण धार्मिक स्वातंत्र्य आणि जागतिक धोरण, जे कोणत्याही धर्माचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहेत. ख्रिश्चनांचा छळ, सेमेटिझम, ज्यूंचा द्वेष, हिंदू आणि इतरांविरुद्धचा नरसंहार आजही सुरू आहे. मी अमेरिकन आणि जागतिक नागरिकांना या वाईट गोष्टींबद्दल उदासीन राहू नये असे आव्हान करते, असे मिलबेनने म्हटले आहे. भारताचे राष्ट्रगीत आणि ओम जय जगदीश हरे हे भक्तिगीत गायल्यानंतर, मिलबेन भारतात आणि भारतीय-अमेरिकन लोकांमध्ये मध्ये खूप लोकप्रिय आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Usa national singer mary millben tweet kashmiri pandits from the valley abn

ताज्या बातम्या