उत्तर प्रदेश सरकारने ‘तान्हाजी-द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला टॅक्स फ्री केलं आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत सैफअली खान आणि काजोलही मुख्य भूमिकेत आहेत. तान्हाजी चित्रपटाला टॅक्स फ्री केलं जावं अशी मागणी फार आधीपासूनच सुरु होती. उत्तर प्रदेशात ही मागणी मान्य करण्यात आली असून चित्रपट टॅक्स फ्री केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही चित्रपट टॅक्स फ्री केला जावा अशी मागणी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तान्हाजी यांचं शौर्य आणि त्यागापासून लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणने चित्रपट टॅक्स फ्री करण्याची विनंती केली होती. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारकडून निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर अजय देवगणने ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.

अजय देवगणने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “उत्तर प्रदेशात चित्रपट टॅक्स फ्री केल्याबद्दल योगी आदित्यनाथजी तुमचे आभार. हा चित्रपट तुम्ही पाहिलात तर मला अजून आनंद होईल”.

दरम्यान महाराष्ट्रातही चित्रपट टॅक्स फ्री केला जावा अशी मागणी होत आहे. मात्र अद्यापही यासंबंधी निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या स्वप्नामध्ये अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यापैकी एक असणाऱ्या तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा भव्यदिव्य रुपात मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. दिग्दर्शक ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने तान्हाजीच्या माध्यमातून दणक्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

केवळ चार दिवसांमध्ये  चित्रपटाने ७५ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये समाविष्ट होईल

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh yogi adityanath ajay devgan tanhaji the unsung warrior tax free sgy
First published on: 14-01-2020 at 11:44 IST