विनोदी-थरारपट प्रकारात मोडणारा ‘चीटर’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता वैभव तत्ववादी प्रमुख भूमिकेत आहे. ‘शॉर्टकट’ चित्रपटात कॉम्प्युटर हॅकरची, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ चित्रपटात तडफदार महाविद्यालयीन विद्यार्थाची भूमिका साकारणारा वैभव या चित्रपटात एका भामट्याची भूमिका साकारताना दिसतो. सदर भूमिका योग्यप्रकारे साकारण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. ‘स्विस एन्टरटेन्मेंट’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय फणसेकर यांचे असून, चित्रपटाची कथादेखील त्यांनीच लिहिली आहे. हृषिकेश जोशी, वैभव तत्ववादी, असावरी जोशी, सुहास जोशी आणि पूजा सावंत यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. अखिल जोशी यांनी या चित्रपटातील चारही गाणी लिहिली असून अभिजित नार्वेकर यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. या सिनेमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी पहिल्यांदाच एकाच मराठी चित्रपटासाठी दोन गाणी गायली आहेत.गायक अवधूत गुप्ते, गायिका उर्मिला धनगर, आनंदी जोशी यांच्या आवाजातही चित्रपटातील अन्य गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.