प्रेमीकांसाठी महत्त्वाचा असलेला दिवस म्हणजे १४ फेब्रुवारी. आपल्याला आवडणारी कलाकार मंडळी ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या दिवशी काय करतात? हा दिवस कसा साजरा करणार? असे अनेक प्रश्न कलाकरांच्या चाहत्यांमध्ये निर्माण होतात. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या चाहत्यांसाठीही त्याच्या ‘व्हॅलेंटाइन डे’ विषयी कुतूहल नक्कीच असेल. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमध्ये दोन बायकांमध्ये गोंधळलेल्या ‘गुरुनाथ’ला म्हणजेच सर्वांच्या लाडक्या अभिजीतला या दिवसाविषयी काय वाटते? यंदाचा व्हॅलेंटाइन तो कसा साजरा करणार? याविषयी जाणून घेऊया.

व्हॅलेंटाइन डे विषयी तुझं काय मत आहे?
सध्या चांगुलपणा हरवत चालला आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने सर्वांशी आपुलकी व प्रेमाने वागत प्रेमाचा, आपलेपणाचा गोड संदेश आपण सगळ्यांना द्यायला हवा असं मला वाटतं. हा दिवस फक्त कपल्सनेच सेलिब्रेट करावा असं नाही तर प्रत्येक नात्यामधला प्रेमाचा गोडवा वाढावा यासाठी या दिवसाचं औचित्य साधायला हवं.

ipl 2024 mi vs rr irfan pathan once again targeted hardik pandya he is looking for an easy way to way to make a comeback
Video: “IPL मध्ये वापसीसाठी सोपा मार्ग..” इरफान पठाणचा हार्दिक पंड्याला शाब्दिक चिमटा, म्हणाला, “आदर नाही…”
IPL 2024 Shivam Dube Wife Anjum Khan Share Emotional Post for MS Dhoni on Instagram
IPL 2024: ‘सॉरी’ म्हणत शिवम दुबेच्या पत्नीची धोनीसाठी लांबलचक पोस्ट; अंजुम खान म्हणाली, “माझ्या तोंडून एकही शब्द..”
vivek kumar rungta indian businessman gifts rs 5 crore lamborghini car to son 18th birthday
लेकासाठी कायपण! १८ व्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी गिफ्ट म्हणून दिली ५ कोटींची लम्बोर्गिनी कार; पाहा VIDEO
Meta CEO Mark Zuckerberg After Post Knee Surgery video of himself performing a leg press workout watch ones
मार्क झुकरबर्ग पुन्हा बॉक्सिंगचा सराव करण्यासाठी सज्ज; शस्त्रक्रियेनंतर पाच महिन्यांनी शेअर केला नवा VIDEO; म्हणाले, ‘तुमचं प्रेम…’

img-20170208-wa0003

यंदाचा व्हॅलेंटाइन डे तू कशाप्रकारे साजरा करणार?
आमच्या लग्नाचा वाढदिवस १ फेब्रुवारीला असल्याने १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी आम्ही व्हॅलेंटाइन वीक सेलिब्रेट करतो. यंदा कामाचं व्यस्त शेड्यूल असल्यामुळे हटके काहीतरी करणं शक्य नसलं तरी एक छानसं प्लेझंट सरप्राईज सुखदाला देणार आहे.

तुझ्या लक्षात राहिलेली व्हॅलेंटाइन डेची एखादी गोड आठवण सांग?
गेल्यावर्षी मी सुखदासाठी स्वत:च्या हाताने स्वयंपाक बनवला होता; तो कितपत चांगला झाला ते माहित नाही पण सुखदासाठी तो एक सुखद धक्का होता. तसचं एका व्हॅलेंटाइन डेला आम्ही गेट ऑफ इंडियाला फिरायला गेलो होतो. तेथे मी सुखदासाठी एक यॉर्ट बुक केली होती. अथांग समुद्राचं आणि सुर्यास्ताचं विहंगम दृश्य मनात साठवत आम्ही हा दिवस साजरा केला होता. ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित भय या माझ्या आगामी चित्रपटातील एक रोमँटिक गीत आम्ही क्रुझवर चित्रीत केलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने आम्ही सेलिब्रेट केलेल्या रोमँटिक डेटच्या आठवणीला पुन्हा उजाळा मिळाला.