‘वॉर’मध्ये बिकिनी सीन करणाऱ्या वाणीच्या फिटनेसचे रहस्य जाणून घ्या

याआधी वाणी कपूरने ‘बेफिक्रे’ चित्रपटात अतिशय हॉट सीन केले आहेत

अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा बहुचर्चित चित्रपट ‘वॉर’चा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे. ५३ सेकंदांच्या या टीझरमध्ये अफलातून साहसदृश्य पाहायला मिळत आहेत. दरम्यान रितक आणि टायगर यांच्यामध्ये ऑनस्क्रीन टक्कर पाहायला मिळणार आहे. यामध्ये अभिनेत्री वाणी कपूरचा बिकिनी अंदाजसुद्धा पाहायला मिळतो आहे. गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये वाणी कपूर अत्यंत हॉट लूकमध्ये दिसत आहे.

वाणी कपूरचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी वाणी कपूर अभिनेता रणवीर सिंगसह ‘बेफिक्रे’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने अतिशय हॉट सीन केले आहेत. त्यामुळे वाणी कपूर ही बॉलिवूडमधील अतिशय हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. वाणी फिट राहण्यासाठी जीमला जाते, डाएट प्लॅन फॉलो करते. चला जाणून घेऊन वाणी कपूच्या फिट राहण्याचे रहस्य.

डाएट प्लॅन
वाणीला सर्व प्रकारचे जेवण आवडते. परंतु ती फिट राहण्यासाठी कमी जेवण करण्यावर विश्वास ठेवते. तिच्या डाएटमध्ये अॅन्टीऑक्सिडंट, प्रोटीन, फळे आणि भाज्या यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश केला आहे. दरम्यान चेहऱ्यावरील चमक कायम ठेवण्यासाठी ती जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करण्याकडे लक्ष देते.

वर्कआऊट प्लॅन
फिट राहण्यासाठी वाणी स्ट्रिक्ट फिटनेस रुटीन फॉलो करते. ती आठवड्यातले चार दिवस जिमला जाते. तिच्या वर्कआऊट रुटीनमध्ये कार्डियो आणि वेट ट्रेनिंग यांचा समावेश आहे. तसेच ती तणाव कमी करण्यासाठी योग करते. वाणी कपूर फिट राहण्यासाठी डान्सदेखील करताना दिसते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vani kapoor diet plan avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या