भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि बॉलिवूड दिवा अनुष्का शर्माच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. साखरपुडा, मेहंदी, हळद आणि लग्नाचे व्हिडिओ सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. इटलीमध्ये झालेल्या या डेस्टिनेशन वेडिंगचे फोटो डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओंमध्ये एक व्हिडिओ मात्र सर्वांचे विशेष लक्ष वेधतोय.
वाचा : विरुष्काच्या डेस्टिनेशन वेडिंगमागे या ‘लव्ह गुरु’चा हात
विराट कोहली वेळोवेळी अनुष्कावरील त्याचे प्रेम व्यक्त करत आला आहे. लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांमध्येही विराट – अनुष्कामधील केमिस्ट्री पाहावयास मिळाली. यावेळी विराटने त्याच्या ‘लेडी लव्ह’ अनुष्कासाठी ‘गोल्डन एरा’मधील ‘मेरे मेहबूब’ हे प्रसिद्ध गाणे गायले. गाण्याचा व्हिडिओ पाहता हा क्रिकेटपटू किती रोमॅण्टिक आहे हे दिसून येते. तर अनुष्काही यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे भाव लपवू शकली नाही.
वाचा : अनुष्काच्या आजीने केला मोठा खुलासा, लहानपणी ‘विरुष्का’ एकत्र खेळायचे क्रिकेट
अनुष्का आणि विराटने लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या चाहत्यांना काल संध्याकाळी ही आनंदाची बातमी दिली. या फोटोंना दोघांनीही एकच कॅप्शन दिली होती. त्यांनी लिहिलं की, ‘आज आम्ही आयुष्यभर एकमेकांच्या प्रेमात राहण्याचे वचन दिले. ही गोष्ट चाहते, मित्र- परिवारासोबत शेअर करताना अत्यानंद होत आहे. तुमच्या सदिच्छा अशाच आमच्या पाठिशी राहो. आमच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग झाल्याबद्दल धन्यवाद.’
Look who is singing! @imVkohli! #VirushkaWEDDING pic.twitter.com/fgPrFaj78X
— ????? ???????? (@YSRCPTechCell) December 12, 2017
EXCLUSIVE : @imvkohli singing! #VirushkaWEDDING pic.twitter.com/szVRNnx366
— Virat Kohli¹⁸ (@ViratCrew) December 12, 2017