प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन आपल्या आगामी ‘बेगम जान’ या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटात विद्या बालन कुंटणखान्याच्या प्रमुख बाईच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बेगम जान’ हा चित्रपट ‘राज काहिणी’ या बंगाली चित्रपटाचा रिमेक आहे. ‘राज काहिणी’ हा चित्रपट श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातील बेगम जानची भूमिका रितूपर्णा सेनगुप्ताने साकारली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर ‘बेगम जान’ चित्रपटात विद्या बालन बेगम जानच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक श्रीजित मुखर्जीने चित्रपटाच्या चित्रिकरणास जून महिन्यापासून सुरूवात होणार असल्याचे सांगितले. या चित्रपटाचे निर्माते महेश भट आहे.

‘डर्टी पिक्चर’, ‘कहाणी’, ‘इश्कीया’सारख्या चित्रपटांमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारी विद्या बालन आता ‘बेगम जान’ चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिध्द करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan all set for partition tale begum jaan
First published on: 21-04-2016 at 13:24 IST