लहान मुलीचा स्कर्ट ओढण्याच्या दृश्यामुळे ‘कमांडो 3’ चित्रपट वादात, नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार

चित्रपट निर्मात्यांनी प्रमोशनसाठी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे हा वाद सुरु झाला आहे

नुकताच बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा ‘कमांडो ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या प्रमोनशसाठी निर्मात्यांनी अभिनेत्याच्या एण्ट्रीचा एक सीन यूट्यूबवर शेअर केला होता. या सीनमुळे सध्या सोशल मीडियावर चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांवर टीका करण्यात आली आहे.

यूट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या पाच मिनिटाच्या व्हिडीओमध्ये पहिलवान एका शाळेतील मुलीचा स्कर्ट ओढत असल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. पहिलवान हे कृत्य करत असताना अभिनेता विद्युतची एण्ट्री होते. तो हे सगळं थांबवतो. पण शाळेतील मुलीवर होणाऱ्या लैंगिक शोषणाचे दृश्य चित्रपटात दाखवल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने तर ‘कमीत कमी लहान मुलांसोबतच्या अशा घटना तरी चित्रपटात दाखवू नका’ असे म्हणत टीका केली आहे.

‘कमांडो ३’ हा चित्रपट कमांडो मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. या चित्रपटात विद्युत जामवाल व्यतिरिक्त अदा शर्मा आणि गुल्शन देवय्या देखील महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचे दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vidyut jammwals entry shows wrestler pulling up a schoolgirls skirt avb

ताज्या बातम्या