विद्युत जामवाल हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. विविध प्रकारचे स्टंट आणि धमाकेदार फाईटिंग स्टाईलच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे विद्युत हा इतर कलाकारांप्रमाणे केवळ रुपेरी पडद्यावर अॅक्शन करत नाही. तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातही विविध प्रकारचे स्टंट करुन चाहत्यांना आश्चर्यचकित करतो.

अवश्य पाहा – ‘तुझ्यासारखी चमचेगीरी करत नाही’; शेतकरी आंदोलनावरुन कंगना-दिलजितमध्ये जुंपली

अवश्य पाहा – अक्षय-सलमानलाही सोडलं मागे; हे ठरले २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्युत हा एक तरबेज मार्शलआर्टिस्ट आहे. लहानपणापासून तो कलारिपयट्टू या फाईटिंग स्टाईलची ट्रेनिंग घेत आहे. आपल्या ट्रेनिंगचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. यावेळी देखील असाच एक थक्क करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो डोळ्यांवर पट्टी बांधून फाईटिंगचा सराव करताना दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या डोळ्यांवर चक्क वितळतं मेण देखील ओतलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.