दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मास्टर’ हा काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. करोना काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये चित्रपटाने जवळपास ७० कोटी रुपयांची कमाई केली होती. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मास्टर’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहते आनंदी झाल्याचे पाहायला मिळते. आता चाहत्यांना विजयचा हा चित्रपट घरबसल्या पाहाता येणार आहे.

कबीर सिंग चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याचे समोर आले आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, मुराद खेतानी मास्टर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हैदराबदला गेले होते. त्यांना चित्रपट प्रचंड आवडला आणि त्यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. त्यासाठी त्यांनी मोठी रक्कमही दिली असल्याचे म्हटले जाते.

‘मास्टर’ या चित्रपटात अॅक्शनचा भरणा आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराजने केले आहे. या चित्रपटात विजय सेतुपतिसोबतच मालविका मोहनन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या रिमेकसाठी बॉलिवूडमधील दोन कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay sethupathi master digital premiere on amazon prime video avb
First published on: 27-01-2021 at 12:16 IST