‘गली बॉय’ चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे विजय वर्मा. या चित्रपटापूर्वी त्याने ‘बमफाड’ आणि ‘शी’ या वेब सीरिजमध्ये काम केले होते. पण ‘गली बॉय’ या चित्रपटाने त्याला वेगळी अशी ओळख निर्माण करुन दिली. आता त्याचा लवकरच ‘यारा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये त्याने ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधील भूमिका कमावल्याचे सांगितले.
नुकताच विजयने मिड-डेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ‘माझी सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील एका भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. माझ्या भूमिकेला नेटफ्लिक्स कडूनही होकार मिळाला होता. पण अनुराग कश्यपने शेवटच्या क्षणी त्याचा निर्णय बदलाल आणि मला वेब सीरिजमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला’ असे म्हटले.
विजय आणि अनुरागमध्ये कोणतीही भांडणे नाहीत. विजयने इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘मी अनुरागला माझा मित्र नाही म्हणू शकत पण मी असं म्हणून शकतो की तो खूप चांगला दिग्दर्शक आहे आणि मी त्याचा आदर करतो. मला असे वाटते त्यांच्यामुळे या इंडस्ट्रीला खूप फायदा झाला आहे. त्यांनी मला वचन दिले आहे की ते लवकरच माझ्यासोबत काम करणार आहेत’ असे म्हटले आहे.