हिंदी चित्रपटसृष्टीत दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नी गीतांजली यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अलिबाग येथील मांडवा येथे त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी अभिनेता अक्षय खन्ना व राहुल खन्ना हे दोन्ही मुले उपस्थित होते. गीतांजली यांच्या पार्थिवावर मांडवा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्यावर्षी विनोद खन्ना यांचे निधन झाले होते. आणि आता गीताजंली यांचे निधन झाले आहे. अक्षय खन्ना व राहुल खन्नावरून आई आणि वडील असं दोघांचही छत्र हरपलं आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2018 रोजी प्रकाशित
दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नी गीतांजली यांचे निधन
अभिनेता अक्षय खन्नाला मातृशोक
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 16-12-2018 at 12:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod khanna wife gitanjali khanna passed away