सध्या चित्रपट वर्तुळामध्ये ‘बार बार देखो’ या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या हटके कल्पनांच्या या दिवसांमध्ये ‘बार बार देखो’ या चित्रपटाच्या नुसत्या गाण्याच्याच प्रसिद्धीने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ट्विटर आणि यू ट्युबच्या माध्यमातून चित्रपटाच्या टीमने या गाण्याची अत्यंत प्रभावीपणे प्रसिद्धी केली होती. आता सरतेशेवटी हे बहुप्रतिक्षित गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  रॅपर बादशाहने ‘काला चष्मा’ गाण्यास संगीतबद्ध केले असून त्यास अमर आर्शी, बादशाह आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे. अमर आर्शीच्या १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘तेनु काला चष्मा जजता वे’ या सुप्रसिद्ध पंजाबी गाण्याचा हा रिमेक आहे. तर गाण्याची कोरिओग्राफी बॉस्को-सिझर यांनी केली आहे. गेले कित्येक दिवस रुपेरी पडद्यापासून दूर असलेली कतरिना तिच्या आगामी ‘बार बार देखो’ या चित्रपटातील नव्या गाण्याच्या लुकसाठी ट्रेंडमध्ये आली आहे असेच म्हणावे लागेल.
दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफवर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्याचे वेड राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान मोदींनाही लागल्याचे दिसते. खरंतर सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोला सतत रिट्विटही केले जातेय. ‘बार बार देखो’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात उतरलेल्या नित्या मेहराने प्रणब मुखर्जी आणि मोदी यांनी काळा चष्मा घातला आहे, असा एक फोटो ट्विट केलाय. या फोटोस तिने काला चष्मा आणि बार बार देखो असे हॅशटॅग्सही दिले आहेत. तिने ट्विट करताच या फोटोने सोशल मिडियावर अगदी धुमाकूळ घातला. या फोटोकडे पाहिले तर असे वाटते की काला चष्मा गाणे पाहिल्यावर त्याचे फॅन झालेल्या देशातील या दोन मोठ्या व्यक्तिंनी ही विशेष पोज दिली असावी. आता यात सत्य किती आहे ते त्यांनाच माहित असावे.

Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
shiv sena and ncp factions manifesto not yet released
जाहीरनाम्यांची प्रतीक्षाच; पहिला टप्पा होऊनही शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून जाहीरनामे नाहीत
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
Narendra Modi sanjay raut
“इस्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार”, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना सूचक इशारा