क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या अनेक प्रेमी युगुलांना ‘रिलेशनशिप गोल्स’ देत आहे. त्यांचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात चर्चेत येतो आणि व्हायरलही होतो. दिवाळीच्या मुहूर्तावरही ही सर्वांचीच आवडती जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या दोघांनी काही दिवसांपूर्वीच ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रॅण्डसाठी जाहिरात केली होती. ही जाहिरात काल पाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आली. जाहिरात प्रदर्शित होऊन अवघे काहीच तास लोटले तोवर युट्यूबवर जवळपास साडेतीन लाखपेक्षाही अधिक व्ह्यूज तिला मिळालेत.
वाचा : २८० रुपयांवरून ट्विंकल खन्ना दुकानदारावर भडकली
मान्यवरच्या जाहिरातीत ‘विरुष्का’ची अफलातून केमिस्ट्री आणि त्यांचे एकमेकांवरचे प्रेम पाहायला मिळते. जाहिरातीत एक जोडपे लग्नाच्या वेळी एकमेकांना वचन देताना दिसतात. ते दोघं एकमेकांना काय वचन देत असतील याचा अंदाज अनुष्का आणि विराट लावत असल्याचे पाहावयास मिळते. मुलाची वचन सांगताना विराट म्हणतो की, मी तुझ्यासाठी महिन्यातील १५ दिवस जेवण बनवेन. त्यावर, मी कोणतीही तक्रार न करता तू केलेले जेवण जेवेन, हे वचन ती मुलगी देत असेल असे अनुष्का म्हणते. अशी अनेक वचनं एकमेकांना सांगत असतानाच विराट अनुष्काला मी सदैव तुझी साथ देईन असे म्हणतो आणि त्याचवेळी या दोघांमधील प्रेम त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसून येते.
वाचा : प्रेमाची नाती फार गुंतागुंतीची असतात- दीपिका पदुकोण
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विराटने आमिरसोबत एका कार्यक्रमात अनुष्काला प्रेमाने ‘नुष्की’ या नावाने हाक मारत असल्याचे सांगितले होते. याच कार्यक्रमात त्याने अनुष्का त्याला कोणत्या नावाने हाक मारते हे देखील सांगितले. विराटने या कार्यक्रमात अनुष्कावर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला. तो म्हणाला की, धोनीने मैदानात ‘चिकू’ म्हणून हाक मारताना यष्टिमधील माईकमध्ये रेकॉर्ड झाले होते. अनुष्काने ते ऐकले तेव्हापासून ती मला ‘चिकू’ या नावनेच हाक मारणे पसंत करते.