विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर कायमचे ‘विरुष्का’ झाले. दोघांनी सोमवारी ११ तारखेला इटलीत लग्न केलं. या लग्नाबाबत फार गुप्तता बाळगण्यात आली होती. त्यामुळेच लग्नात फक्त ४५ ते ५० व्यक्तीच उपस्थित होत्या. या लग्नाला बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील एकही सदस्य उपस्थित नव्हता असेच अनेकांना वाटत होते. पण या लग्नाला क्रिकेट विश्वातील काही मंडळी नक्कीच उपस्थित होती. १७ वर्षाखालील भारतीय संघात विराट खेळत असताना त्याचा कर्णधार असलेला वर्तिक तिहारा या लग्नाला उपस्थित होता. ४ दिवसांच्या या लग्नसमारंभात वर्तिक पहिल्या दिवसापासून विराटसोबत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्तिकचे नाव फारसे कोणाला माहित नसेल. १२ वर्षांपूर्वी विराट १७ वर्षाखालील संघाचा खेळाडू होता. तेव्हा वर्तिक त्या संघाचा कर्णधार होता. विराट आणि वर्तिक फार जवळचे मित्र आहेत. विराटसोबत दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळलेला गीत वत्सही या लग्नाला उपस्थित होता. विराटने भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूला लग्नाला बोलावले नसले तरी त्याने जुन्या सहकाऱ्यांना मात्र आवर्जुन बोलावले.

विराट, अनुष्का

अनुष्काला प्रसारमाध्यमांपासून दूर ‘डेस्टिनेश वेडिंग’ हवे होते. यामुळेच दोघांनी इटलीतील टस्कनीची निवड केली. थंडीच्या दिवसांमध्ये हे ठिकाण बंद ठेवण्यात येते पण विरुष्काच्या लग्नासाठी खास हे ठिकाण खुले करण्यात आले. १३ व्या शतकात वसलेल्या या गावात एकूण ५ मोठे व्हिला आहेत. यातील एका व्हिलामध्ये विरुष्काने लग्न केले. या व्हिलात एकूण २२ रुम असून साधारणपणे ४४ लोकं या व्हिलामध्ये राहू शकतात. फ्लॉरेन्सपासून ही जागा सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli anushka sharma wedding cricketer vartik tihara attended the marrige
First published on: 13-12-2017 at 12:08 IST