विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबरला सोमवारी लग्न केले. या लग्नाला अगदी मोजक्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना आमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रितांच्या यादीत अनुष्का शर्माचे कौटुंबिक गुरू अनंत महाराज आणि विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. माध्यमांतील वृत्तनुसार या लग्नाला विराटचे लहानपणीचे काही मित्रही या लग्नाला आवर्जुन उपस्थित होते. पण हे मित्र नक्की कोण ते कळू शकलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या लग्नाला विराटची आई, मोठा भाऊ-वहिनी आणि पुतण्या, तर अनुष्काचे आई-बाबा आणि भाऊ उपस्थित होते. बॉलिवूडमधून अनुष्काने फक्त शाहरुख खानला बोलावले होते. पण किंग खान या लग्नाला उपस्थित राहू शकला नाही. विरुष्काचे लग्न इटलीतील टस्कनी या शांत आणि निसर्गरम्य गावात झाले. दोघांच्या लग्नात क्रिकेट विश्वातील तसेच बॉलिवूड विश्वातील एकही सदस्य दिसला नाही.

लग्नासाठी सुमारे एक कंटेनर भरून फुलं मागवण्यात आली होती. मेहंदी पासून ते विराटच्या हळदी समारंभापर्यंत बऱ्याच गोष्टींचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. प्रत्येकजण ते व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. अनुष्काच्या ‘बिदाई’चा व्हिडिओसुद्धा अनेकांचेच लक्ष वेधतं आहे. ‘दिन शगना दा चढेया…’ हे गाणे सुरु असतानाच अनुष्काची पाठवणी होत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

नवदांम्पत्य २१ तारखेला दिल्लीमध्ये आणि २६ तारखेला मुंबईत त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि क्रिकेट, बॉलिवूड जगतातील इतर मान्यवरांसाठी रिसेप्शन ठेवणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli anushka sharma wedding photos italy relatives
First published on: 12-12-2017 at 16:37 IST