टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे कुटुंबीय इटलीला रवाना झाले होते. यावरून दोघेही लवकरच विवाह करणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. तसेच इटलीच्या मिलानमधील एक आलिशान हॉटेलही ९ ते १२ डिसेंबरदरम्यान आरक्षित करण्यात आले होते. अखेर आज दोघेही सात फेरे घेत लग्नबेडीत अडकले. आज रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला दोघांतर्फे अधिकृतपणे त्यांच्या विवाहाबाबतची घोषणा करण्यात आली. या विवाहसोहळ्यासाठी काही निमंत्रितांनाच बोलावण्यात आले होते. यामुळे ‘विरुष्का’चे चाहते नाराज झाले होते. परंतु, येत्या २२ डिसेंबरला मुंबईमध्ये जय्यत स्वागतसमारंभ आयोजित करण्यात आल्याचे समजते. ‘विरूष्का’ने ट्विटरवरून चाहत्यांना लग्नाची गोड बातमी दिल्यानंतर अनेकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यामध्ये पाकिस्तानी क्रिकेट खेळाडुंसह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.