गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये बायोपिकची जणू एक लाटच आली. अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर या बायोपिकद्वारे प्रकाश टाकण्यात आला. यामध्ये खेळाडूंच्या बायोपिकना जास्त पसंती मिळाली. सचिन तेंडुलकरपासून महेंद्रसिंग धोनीपर्यंतचे बायोपिक बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. येत्या काळातही मिताली राज, सायना नेहवाल, झुलन गोस्वामी या खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने त्याच्या बायोपिकमध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने ही इच्छा बोलून दाखवली आहे. शोएब सलमानचा खूप मोठा चाहता आहे. त्याने अनेकदा सलमानच्या कामाचं कौतुक केलं. २०१६ मध्ये शोएबने सलमानची भेटसुद्धा घेतली होती.

आणखी वाचा : निवेदिता यांनी सांगितली अशोक सराफ यांच्या नावामागची कहाणी; पाहा ‘हा’ खास फोटो

पाकिस्तानी पत्रकार साज सादिक यांनी शोएबचं बायोपिकबद्दलचं हे वक्तव्य ट्विट करत सांगितलं आहे. ‘शोएब अख्तर म्हणाला जर माझ्यावर बायोपिक तयार झाला तर त्यात सलमान खाननं माझी भूमिका साकारावी अशी माझी इच्छा आहे’, असं त्यांनी ट्विट केलं. आता शोएबची ही इच्छा सलमान पूर्ण करु शकेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want salman khan to play lead in my biopic says pakistani cricketar ssv
First published on: 06-05-2020 at 10:00 IST