बडोदा येथील स्थानिक न्यायालयाने अश्लिलता पसरविण्याच्या एका प्रकरणात बॉलिवूडची अभिनेत्री मल्लिका शेरावतच्या विरोधात वॉरंट जारी केले. बडोद्यातील जिल्हा न्यायालयाने वॉरंट जारी करतांना तिला १९ ऑगस्ट रोजी न्यायालयात समक्ष हजर राहण्यास सांगितले.
३१ डिसेंबर २००६ रोजी मुंबईत एका नववर्षाच्या संध्याकाळी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये अश्लिल नृत्य केल्याप्रकरणी मल्लिका शेरावतच्या विरोधात बडोदा बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष नरेंद्र तिवारी यांनी तक्रार नोंदवली होती. ज्यात त्यांनी या प्रकरणी मल्लिकावर अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warrant issued against mallika sherawat for obscene dance
First published on: 09-07-2013 at 10:50 IST