‘बिग बॉस ८’ चे सूत्रसंचालन बॉलीवूडचा बादशाह की दबंग खान करणार यावर गेले काही दिवस चर्चा सुरु होती. मात्र, यंदाच्या पर्वाचेही सूत्रसंचानाची सूत्रे दबंग खानच्याच हाती आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बिग बॉसच्या नव्या पर्वाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये सलमान वैमानिकाच्या पोशाखात दिसतो. डोळ्यावर गॉगल आणि वैमानिकाचा निळा गणवेश यात दबंग खान दिमाखदार दिसतोय.