कंगना रणौत आणि तिच्याविषयी सुरु असलेल्या चर्चा काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच आता आणखी एका मुद्द्यामुळे ‘क्वीन’ कंगना चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे आगामी ‘सिमरन’ या चित्रपटाचं शीर्षक गीत. हंसल मेहता दिग्दर्शित ‘सिमरन’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधीच त्यातील धम्माल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. ‘ओsss चुलबुली सिमरन’ असे बोल असणाऱ्या या गाण्यामध्ये कंगना साकारत असलेली ‘सिमरन’ नेमकी कशी आहे, याचं सुरेख चित्रण करण्यात आलंय.

आयुष्याचा मनमुराद आनंद लुटणारी एक मुलगी, आपल्या आजूबाजूला असलेले लोक, समाजाने आखलेल्या काही बंधनं या साऱ्याची काहीच पर्वा नसणाऱ्या ‘सिमरन’ला या गाण्यातून भेटण्याची संधी मिळतेय. सचिन- जिगरने संगीतबद्ध केलेलं हे गीत जिगर सरैय्याने गायलं आहे. गाण्याची एकंदर चाल पाहता रणबीर कपूरच्या ‘बर्फी’ या चित्रपटाच्या शीर्षक गीताची आठवण आल्यावाचून राहत नाही.

वाचा : कंगनाच्या ‘सिमरन’मधील हिरोबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगनाच्या या चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्येही बरीच उत्सुकता पाहायला मिळतेय. मुख्य म्हणजे कंगना आणि अपूर्व असरानीने या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिल्यामुळे त्यात एक वेगळाच टच असणार अशीही शक्यता वर्तवली जातेय. बॉलिवूड वर्तुळात सध्या कंगनाच्याच नावाची चर्चा रंगलीये. याला कारण ठरतेय तिची एक मुलाखत. या मुलाखतीत तिने चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध चेहऱ्यांची पोलखोल करत त्यांच्यावर आरोप लावले होते. यामध्ये तिने अपूर्व असरानीविषयीसुद्धा वक्तव्य केलं होतं. ‘सिमरन’ चित्रपटातील संवाद लिहिण्यासाठीचं श्रेय नेमकं कुणाचं या मुद्द्यावरुन त्यांच्यात मतभेद असल्याचं म्हटलं जात होतं.