करोना व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ९०च्या दशकातील अनेक हिट आणि आयकॉनिक मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. ‘महाभारत’, ‘रामायण’, ‘शक्तिमान’, ‘सर्कस’ या मालिकांनंतर आता कॉमेडी शो ‘देख भाई देख’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दूरदर्शन नॅशनलने ट्विटरद्वारे हि माहिती प्रेक्षकांना दिली आहे. आता आयकॉनिक कॉमिक शो ‘देख भाई देख’ मध्ये दिवान कुटुंबातील तीन पिढ्यांमधील नाते पुन्हा पाहायला मिळणार आहे. हा शो संध्याकाळी ६ वाजता दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आनंद झाल्याचे दिसत आहे.

‘देख भाई देख’ या शोमध्ये अभिनेते शेखर सुमन, नवीन, फरीदा जलाल, भावना बलसावर, देवेन भोजानी, सुषमा सेठ, विशाल सिंग, नताशा सिंह या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. हा शो ६ मे १९९३ साली डीडी मेट्रोवर प्रदर्शित झाला होता. या शोचा एक वेगळाच प्रेक्षक वर्ग निर्माण झाला होता. त्यावेळी शोने ६५ एपिसोड पूर्ण केले होते. तसेच ‘देख भाई देख’ हा ९०च्या दशकातील एक जबरदस्त हिट शो होतो.आता हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे सर्वजण खूश असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch iconic comic show dekhbhaidekh on dd national avb
First published on: 02-04-2020 at 10:55 IST