हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्व सिनेरसिकांवर छाप पाडणारा श्रेयस तळपदे आता पुन्हा मराठी चित्रपटात येण्यास सज्ज झाला आहे. सनई चौघडे (२००८) चित्रपटानंतर तब्बल सहा वर्षांनी श्रेयस ‘बाजी’ चित्रपटाद्वारे पुनर्पदार्पण करतोय. आज या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्रेयस हा सुपरहिरो आणि सामान्य पुरुष अशा दोन भूमिकांमध्ये दिसतो. एकीकडे तोंडाला कपडा गुंडाळलेला, पाठीवर तलवार लावलेला सुपरहिरो तर दुसरीकडे हातात जड हातोडा आणि डोक्यावर रक्त घरांगळत असलेला पावसात भिजणारा एक प्रेमी अशी श्रेयसची दोन रुपे यात दिसतात. ट्रेलरमध्ये अमृता खानविलकरचीही हलकीशी झलक दिसते. ‘पुणे ५२’ ने दिग्दर्शनात पदार्पण करणा-या निखिल महाजन दिग्दर्शित या चित्रपटात अमृता खानविलकरही मुख्य भूमिकेत दिसणार असून जितेंद्र जोशी खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. दार मोशन पिक्चर्स, सुहृद गोडबोले यांचे इंडियन मॅजिक आय आणि निखिल महाजन यांची ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स अशा तीन चित्रपट संस्थांच्या वतीने ‘बाजी’ चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Aug 2014 रोजी प्रकाशित
पाहाः श्रेयसच्या ‘बाजी’चा ट्रेलर
सनई चौघडे (२००८) चित्रपटानंतर तब्बल सहा वर्षांनी श्रेयस 'बाजी' चित्रपटाद्वारे पुनर्पदार्पण करतोय.

First published on: 01-08-2014 at 03:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch shreyas talpades baji movie trailer