एकता कपूरने जरी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ चित्रपटाची तारीख ९ ऑगस्ट या ईददिनानऐवजी पुढे ढकलली असली तरी त्यासाठीचे विशेष ‘बिसमिल्लाह’ हे गाणे चित्रपटामध्ये चित्रित केले आहे. चित्रपटात मुख्य भूमिका असलेले अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा आणि इरफान खानवर हे क्लब साँग चित्रित करण्यात आले आहे. ‘बिसमिल्लाह’चे लेखन रजत अरोराने केले असून अनुपम अमोदने हे गाणे गायले आहे. गाण्यात सोनाक्षी एका नव्या रुपात दिसत आहे.
नुकतेच या गाण्याचे चित्रिकरण फिल्मसिटी आणि एका नाइट क्लबमध्ये करण्यात आले.