सलमानची सर्वात लहान बहिण अर्पिता खान शर्मा आणि पती आयुष यांच्या घरी ३० मार्च रोजी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले. खान कुटुंबियांसाठी तर हा मोठा आनंदाचा क्षण होता. तेव्हापासून अर्पिता आणि आयुषचा मुलगा अहिल हा सर्वांचेच लक्ष केंद्रित करतोय. अहिलचे खान कुटुंबियांसोबतचे फोटो वरचेवर आपल्याला सोशल मिडियावर पाहावयास मिळतात.
नुकताचं, आयुष शर्माने त्याच्या छोट्या सुपर शर्माचा म्हणजेच अहिलचा एक सुंदर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. छोट्या अहिलचे अगदी सेकंदातचं बदलणारे भाव या व्हिडिओत कैद करण्यात आले आहेत. अहिलचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही चेह-यावर सुंदर हास्य येईल.

A video posted by Aayush Sharma (@aaysharma) on