सेलिब्रिटींच्या घरी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्टीमध्ये गप्पांचे अनेक फड रंगतात हे खरे. पण, तुम्हाला माहितीये का त्यात कोणत्या गप्पा रंगतात? सेलिब्रिटींच्या घरी रंगणाऱ्या गप्पांच्या मैफीलीचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आमिर खानच्या दिवाळी पार्टीतील या व्हिडिओमध्ये बरेच सेलिब्रिटी दिसत असून, आमिर त्या सर्वांनाच काहीतरी सांगत आहे. मुख्य म्हणजे अभिनेता शाहरुख खानही आमिरचे बोलणे थक्क होऊन ऐकताना दिसतोय. कारण, आमिर या व्हिडिओत पाहुण्यांना एका जादुगाराविषयी मोठ्या कुतूहलाने सांगताना दिसतोय.

करण सिंग नावाच्या जादूगाराला आमिर जेव्हा भेटला होता, तेव्हा त्याची जादू पाहून आपण कसे अचंबित झालो होतो, हे तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे मोठ्या कुतूहलाने सांगत होता. आमिरने ज्या प्रसंगाविषयी सांगून शाहरुखलाही थक्क केले, मुख्य म्हणजे त्यावेळी करणही तेथे उपस्थित होता. त्याच प्रसंगाचा व्हिडिओ करण सिंग या जादूगाराने त्याच्या ‘करण सिंग मॅजिक’ या फेसबुक पेजवरुन शेअर केला. या व्हिडिओत पत्ते आणि ‘माइंड रिडिंग’च्या सहाय्याने करणने कशा प्रकारे ‘परफेक्शनिस्ट’ आमिरलाही विचारांच्या भोवऱ्या अडकवले होते, याची झलक पाहायला मिळते. करणने शेअर केलेल्या व्हिडिओत फक्त आमिरच नव्हे तर, त्याची पत्नी किरण रावही आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळत आहे.

EXCLUSIVE : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजवर अनेकांनीच चित्रपटांमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात जादूचे प्रयोग पाहिले असतील. पण, प्रत्यक्षात कोणतीही हातचलाखी न करता फक्त ‘माइंड रिडिंग’च्या जोरावर एखाद्याचे कसब पाहण्याचा अनुभव किती भन्नाट असू शकतो, हे व्हिडिओ पाहून लक्षात येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनीच पाहिला असून, करणच्या अनोख्या कलेचीही प्रशंसा केली आहे. त्यामुळे एका अर्थी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची जादू करणाऱ्या आमिर आणि शाहरुखवर करणचीच जादू झाल्याचे म्हणायला हरकत नाही.