दीपिका पदुकोणच्या नुसत्या स्मितहास्याने लाखो, करोडो चाहत्यांचे भान हरपते. तिचे सौंदर्य आणि चेहऱ्यावरील साधेपणा पाहता या अभिनेत्रीच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा या दीपिकाच्या सौंदर्याचे आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाने सेलिब्रिटींवरही प्रभाव पाडला आहे. मुळात तिच्याप्रती आपल्या मनातील भाव उघडपणे व्यक्त करत एका अभिनेत्याने अनेकांनाच थक्क केले आहे. तो अभिनेता म्हणजे रणवीर सिंग.

दीपिका आणि रणवीर एकमेकांना डेट करत असून, गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्याचे हे नाते अधिकाधिक दृढ होत चालले आहे, असे म्हटले जातेय. याचाच प्रत्यय इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओतून येतोय. या व्हिडिओमध्ये ‘इक लडकी को देखा तो ऐसा लगा’ असे म्हणत सर्वांसमोर येणाऱ्या रणवीरला पाहून खुद्द दीपिकाही काही क्षणांसाठी थक्क झाल्याचे पाहायला मिळते आहे.

https://www.instagram.com/p/Bb7b1fXl2Ia/

वाचा : जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ज्याप्रमाणे करोडो चाहत्यांच्या आयुष्यात येऊन तू त्यांचे आयुष्य प्रकाशमान केले आहेस त्याचप्रमाणे तू माझं आयुष्यही प्रकाशमान केले आहेस. देवाकडे माझी एकच प्रार्थना आहे की, तुझ्या आयुष्यातही असा आनंद कायम राहो, कारण तुझ्यासारखं दुसरं कोणी असूच शकत नाही’, असे म्हणत रणवीरने दीपिकाप्रती आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. रणवीर आणि दीपिकाची ही केमिस्ट्री सध्या अनेकांचीच मनं जिंकत आहे. ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. तेव्हापासूनच या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले अन बॉलिवूडला आणखी एक ‘सिझलिंग कपल’ मिळाले.