कलाविश्वातील सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात काय घडतंय याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलेले बरेच कलाकार इंडस्ट्रीत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शाहिद कपूर. करीना कपूरशी शाहिदचं असलेलं अफेअर हे जगजाहीर होतंच. तिच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राशी त्याचं नाव जोडलं गेलं. ‘कमिने’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. प्रसारमाध्यमांसमोर दोघांनी कधीच नात्याला स्विकारलं नव्हतं. पण या दोघांच्या अफेअरच्या चर्चा चवीने चघळल्या जायच्या. या दोघांचा असाच एक किस्सा फार गाजला होता.

प्रियांकाच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती. तेव्हा शाहिद कपूरने दरवाजा उघडला होता. ही गोष्ट त्यावेळी वाऱ्यासारखी पसरली होती. नंतर एका मुलाखतीत प्रियांकाला याविषयी प्रश्न विचारला असता तिने सारवासारव करत म्हटलं होतं की, “त्यावेळी शाहिदचं घर माझ्या शेजारीच होतं. माझ्या घरी आई नव्हती आणि बाबा शहराबाहेर गेले होते. आयकर विभागाने धाड टाकल्याने मी फार घाबरले होते. म्हणून शाहिदला घरी बोलावलं होतं.”

Photos: कोट्यधीश अनुष्का शर्माची संपत्ती; आकडा पाहून व्हाल थक्क!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहिद आणि प्रियांकाचं नातंही फार काळ टिकलं नाही. २०१५ मध्ये शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी व एक मुलगा आहे.