रणबीर कपूर आहे तैमूरचा चाहता

एका मुलाखतीमध्ये त्याने खुलासा केला आहे.

taimur ali khan videos, Taimur Ali Khan photos, Taimur Ali Khan, ranbir kapoor taimur ali khan fan, Ranbir Kapoor childhood, ranbir kapoor,
तो सोशल मीडियावर सतत तैमूरचे फोटो पाहात असतो

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा मोठा मुलगा म्हणजे तैमूर अली खान. तैमूर हा सतत चर्चेत असतो. त्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. तैमूरचे लाखो चाहते आहेत. त्यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा देखील समावेश आहे. रणबीरने एका मुलाखतीमध्ये मी तैमूरचा चाहता आहे असे म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखातीमध्ये रणबीरने तो तैमूरचा चाहता असल्याचे म्हटले आहे. तसेच तो सोशल मीडियावर सतत तैमूरचे फोटो पाहात असल्याचे देखील त्याने म्हटले आहे. तैमूरचा हेअर कट तसेच त्याची चालण्याची स्टाइल रणबीरला प्रचंड आवडत असल्याचे त्याने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor (@ranbir_kapoooor)

या मुलाखतीमध्ये रणबीरने त्याच्या बालपणीच्या आठवणींना देखील उजाळा दिला. त्याने त्याची तुलना तैमूरशी केली आहे. ‘त्यावेळी फोटोग्राफर वैगरे नव्हते. हा पण लोकांना माहिती होते की रणबीर आणि रिद्धिमा हे ऋषि कूपर यांची मुले आहेत’ असे रणबीर म्हणाला. बालपणी रणबीरने आई-वडिलांसोबत खूप चांगला वेळ घालवला असे देखील तो म्हणाला होता.

लवकरच रणबीरचा ‘बह्मास्त्र’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच रणबीरचा ‘एनिमल’ हा चित्रपट देखील येणार आहे. या व्यतिरिक्त तो दिग्दर्शक लव रंजन यांच्या चित्रपटामध्ये देखील भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदा अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत काम करताना दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: When ranbir kapoor confessed to being a taimur ali khan fan avb

ताज्या बातम्या