२००० साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटातून अभिनेता हृतिक रोशनने कलाविश्वात पदार्पण केलं. हृतिकला पहिल्याच चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामध्ये हृतिकने रोहित ही व्यक्तिरेखा साकारली होती. विशेष म्हणजे त्याच्या भूमिकेप्रमाणेच त्याच्या लहान भावाची भूमिका करणाऱ्या अभिषेक शर्माचीही प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटली. या चित्रपटात अभिषेकने अमित ही भूमिका वठविली होती. आजही ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाचं नाव घेतल्यानंतर अनेकांच्या मनात या चित्रपटातील कलाकार काय करत असतील? असा प्रश्न निर्माण होतो. यामध्ये अभिषेकचं नाव आवर्जुन घेतं जातं. बालकलाकार म्हणून काम करणारा अभिषेक आता कसा दिसतो? किंवा काय करतो? हा प्रश्न प्रेक्षकांना हमखास पडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिषेक आता मोठा झाला असून तो प्रचंड स्मार्ट आणि हॅण्डसम दिसतो. त्यामुळेच सध्या तो अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या अभषेकचा आता छोट्या पडद्यावर दबदबा वाढला असून सध्या अभिषेक छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेबसीरिजमध्ये सर्वाधिक झळकत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘मिले जब हम तुम’, ‘हल्लो हम लल्लन बोल रहे हैं’, ‘रम पम पो’ आणि ‘ससुराल सिमर का’ या लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने मुख्य भूमिका केली आहे. तसंच त्याने ‘फेसलेस’ आणि ‘माय नेम इज शीला’ या सीरिजमध्येही काम केलं आहे.विशेष म्हणजे तो ‘बिग बॉस’मध्येही सहभागी झाला होता.

दरम्यान, ‘कहो ना प्यार है’प्रमाणेच अभिषेकने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. सनी देओलची मुख्य भूमिका असलेल्या ‘चॅम्पियन’ या चित्रपटातही तो झळकला आहे. २००० नंतर त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाला. परंतु २००६ साली दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘कॉर्पोरेट’ या चित्रपटातून तो पुन्हा एकदा कलाविश्वामध्ये सक्रीय झाला. या चित्रपटामध्ये त्याने छोटेखानी भूमिका वठविली होती.

 

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where is kaho naa pyaar hai kid abhishek sharma ssj
First published on: 16-01-2020 at 10:35 IST