बॉलिवूडचा मि. परफेस्शनिस्ट आमीर खान सध्या ‘दंगल’ या त्याच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. चित्रपटात तो तीन तरुण मुलींच्या पित्याची भूमिका साकारत आहे. परंतु, चित्रपटातील आमीरच्या या मुलींची भूमिका साकारण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड करताना चित्रपटकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. या भूमिकेसाठी आत्तापर्यंत २१००० मुलींची ऑडिशन घेण्यात आली असून, अद्याप कोणालाही करारबद्ध करण्यात त्यांना यश आलेले नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन करत असलेला नितेश तिवारी चित्रपटसृष्टीत सक्रिय नसलेल्या मुलीच्या शोधात असल्याचे समजते. थोडे फार अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेला अथवा अभिनयाचे प्रशिक्षण न घेतलेला एखादा नवा चेहरा या भूमिकेसाठी चालणार असला तरी, त्यांची शरीरयष्टी एखाद्या खेळाडूप्रमाणे असणे गरजेचे आहे. शिवाय, कठोर प्रशिक्षण घेण्याची त्यांची तयारी असायला हवी.
कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गिता, बबिता आणि संगिता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. प्रत्येक चित्रपटात आपल्या भूमिकेसाठी सर्व प्रकारची मेहनत घेणाऱ्या आमीरने या चित्रपटातील भूमिकेसाठी स्वत:चे वजन ९० किलो इतके केले आहे. २२ किलो वजन वाढविण्याबरोबरच तो शाकाहारी झाला असून, हरयाणवी भाषा शिकत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who among the 21000 candidates will get to play aamir khans daughters in dangal
First published on: 20-04-2015 at 05:11 IST