हॉलिवूडचे हॉट कपल ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांनी २०१२ मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर फ्रान्समध्ये एका खासगी समारंभात त्यांनी गुपचुप लग्न केले. एका कार्यक्रमामध्ये अँजेलिनाने पीटसोबत लग्न केल्याचे गुपित ही उघड केले होते. ब्रॅड पिटमध्ये एक चांगला माणूस आणि चांगला पिता दिसतो, असे अँजेलिनाने लग्नाची घोषणा करताना म्हटले होते. त्यामुळेच तिने ब्रेड पीटला जीवन साथी म्हणून निवडले होते. अँजलिनाचा हा तिसरा विवाह होता. अॅजेलिना ही लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री असून तिने सामाजिक कार्याने देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाज कार्याच्या ध्यासामुळेच तिने सहा मुलांना दत्तक घेतले. तिच्या लग्नात देखील ही मुले सहभागी झाली होती. १३ वर्षांचा मडॉक्स आणि १० वर्षांचा पॅक्स लग्नाच्या ठिकाणी आई अँजेलिनाला घेऊन आले होते. तर, नऊ वर्षाची झारा आणि सहा वर्षाची विविन या फ्लॉवर गर्ल होत्या. आठ वर्षाचा शिलो आणि सहा वर्षाचा नॉक्सनेवर या चिमुकल्याने  लग्नाच्या अंगठ्या सांभाळण्याची जबाबदारी पार पाडली होती. अँजेलिना दत्तक घेतलेल्या या सहा मुलांवर अत्यंत प्रेम करते. पण आज तिला पीटमध्ये चांगला पिता दिसत नाही. ज्यामुळे तिने त्याला निवडले होते, मात्र ब्रॅड पिट आपल्या मुंलाना चागली वागणूक देत नाही याच कारणावरुन अँजेलिनाने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.