शाहरूख खानची भूमिका असलेल्या ‘रा. वन’चा दिग्दर्शक अनुभव सिन्हा आता निर्माता झाला आहे. अनुभव सिन्हा बॉलिवूडच्या पाण्याखालील पहिल्या ‘वॉर्निंग’ चित्रपटाची निर्मिती करत आहे. जास्तित जास्त चित्रपट करायचे असल्यामुळे आपण निर्मितीकडे वळल्याचे अनुभव म्हणत आहे.
चित्रपट दिग्दर्शनामध्ये गती नसल्यामुळे चित्रपट निर्मितीकडे वळल्याचे ४८ वर्षीय अनुभव सिन्हा सांगतो.
“चित्रपट निर्मितीकडे वळण्याचे मी पाच वर्षांपूर्वीच ठरवले होते. चित्रपट दिग्दर्शनाची माझी गती खूप कमी आहे. मला एक चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी दोन वर्ष लागता. मात्र, मला जास्त चित्रपट करायचे आहेत. इतकी वर्षे मी मला चित्रपट निर्मितीसाठी तयार करत होतो. मी बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील माझ्या निर्माते मित्रांना भेटून त्यांच्याकडून चित्रपट निर्मितीसाठी मार्गदर्शन घेतले आहे.,” असे पीटीआयशी बोलताना अनुभव म्हणाला.
अननुभवची निर्मिती असलेल्या ‘वॉर्निंग’ या ३ डी चित्रपटाचे चित्रिकरण दक्षिण प्रशांत महासागरामध्ये करण्यात आले आहे. अनुभवच्या हाऊस प्रोडक्शन ‘बॅनर्स मिडिया वर्क’ ची ही पहिली निर्मिती आहे.
“माझे प्रोडक्शन हाऊस कोणत्या ही एका ठराविक पठडीतील चित्रपटांची निर्मिती करणार नाही. मी वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण विषय हातळणार आहे. मी ‘वॉर्निंग’ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला कारणा हा एक थिएटर चित्रपट आहे. लोकांना तो चित्रपटगृहांमध्ये जाऊन मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल. वॉर्निंगचे ९० टक्के चित्रिकरण पाण्याखाली करण्यात आले आहे. हा एक प्रायोगीक चित्रपट आहे.” असे अनुभव म्हणाला.
दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये पदार्पन करणाऱ्या गुरमित सिंगने ‘वॉर्निंग’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आयुष्यावर संकट कोसळलेल्या सात मित्रांच्या प्रवासाची ‘वॉर्निंग’ ही एक थरारक कहाणी आहे. या चित्रपटातून संतोष बारमोला, सुझाना रॉड्रीग्ज, वरून शर्मा, मंजरी फडणीस, जितीन गुलाटी, सुमित सुरी आणि मधुरिमा हे तरूण पडद्यावर दिसणार आहेत. पाण्याखालचा थ्रिल अनुभवण्यासाठी मात्र, चित्रपट शौकीनांना २७ सप्टेंबर पर्यत वाट पाहवी लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2013 रोजी प्रकाशित
शाहरूखच्या ‘रा.वन’चा दिग्दर्शक निर्माता का झाला?
शाहरूख खानची भूमिका असलेल्या 'रा. वन'चा दिग्दर्शक अनुभव सिन्हा आता निर्माता झाला आहे. अनुभव सिन्हा बॉलिवूडच्या
First published on: 29-08-2013 at 04:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why shah rukh khans ra one director turned producer