नागपूर आणि आसपास बरेच काही बघण्यासारखे आहे. वाईल्ड लाईफच्या खास करून वाघांच्या आकर्षणामुळे नागपूर भेटीवर आले असून पाच दिवसांत तोडाबासह विविध पर्यटनस्थळांना भेट देणार असल्याचे बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यूटीव्ही स्टार्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्टार इन युवर सिटी’ या कार्यक्रमासाठी  ईशा नागपूर भेटीवर आली आहे. नागपूर हे अत्यंत लोभस शहर असून खूप काही अनुभवण्यासारखे आहे. यूटीव्ही स्टार्सने माझ्या चाहत्यांना वैयक्तिकरित्या भेटण्याची संधी उपलब्ध करू दिल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. या भेटीचा अनुभव रोमांचक आहे. या शहराला नारिंगी शहर म्हणतात ते उगीच नव्हे! या पाच दिवसात संत्र्याच्या रसाचा आणि विष्णूजी की रसोईमधील जेवणाचा आनंद घेणार आहे. पूरण पोळी खाऊन थोडे वजन जरून वाढणार आहे. टेकडी गणेशाचे दर्शन, साडी व ज्वेलरी खरेदी करणार आहे, असा भरगच्च कार्यक्रम असल्याचे ईशा म्हणाली.
ईशाने आज काही वेळ चाहत्यांसोबतही घालविला. चाहत्यांनी नृत्य, अभिनय, आहार याबाबत विचारलेल्या प्रश्नांना तिने मोठय़ा खुबीने उत्तरे दिली. यशाचे गमकही तिने रसिकांना सांगितले.  चेहऱ्यावरील तेज, आनंद व उत्साह कायम ठेवण्यासाठी  नियमित व्यायाम, ध्यान व प्रार्थना करणे आवश्यक असल्याचे ती म्हणाली.
पहिला मराठी चित्रपट ‘मात’
ईशाने दक्षिणेकडील जवळपास १२ आणि काही हिंदी चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. ती पहिल्यांदाच ‘मात’ या मराठी चित्रपटात भूमिका करीत आहे. समीर धर्माधिकारी अभिनेता असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. थिएटरही मिळत आहेत. चित्रपटांपेक्षा छोटय़ा पडद्यांवर काम करणे अधिक आव्हानात्मक असल्याचे ईशा म्हणाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wildlife affectionate isha koppikar visits nagpur
First published on: 10-07-2013 at 12:14 IST