चेहऱयाचा रंग उजळण्याचा तथाकथित दावा करणाऱया सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीत काम करणार नसल्याचे बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सांगितले आहे. त्वचा सुंदर करण्याचा प्रचार करणाऱया कोणत्याही जाहिराती मला करायच्या नाहीत. कोणती गोष्ट चूक आणि कोणती बरोबर हे सांगणाऱया जाहिराती करणे मला चुकीचे वाटते. वर्षद्वेषाचा प्रसार करणाऱया अशा जाहिराती मला करायच्या नाहीत, असे स्पष्ट मत अनुष्काने गुरूवारी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. पॅन्टीन या अग्रगण्य शॅम्पू कंपनीने अनुष्का शर्माची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. या कंपनीच्या एका कार्यक्रमाला अनुष्का उपस्थित होती. आपण छान दिसावे असे सर्वांना वाटते. केसांची काळजीही तितकीच महत्त्वाची आहे. आपले केस चांगले आणि मजबूत असावेत यासाठी आपल्याला काहीतरी करावेसे वाटते. त्यासाठीचे योग्य उपाय हे रास्त आहेत. मात्र, त्वचा सुंदर करण्याचा प्रचार करणाऱया प्रसाधनांची जाहिरात करणे योग्य नाही. सर्वांची त्वचा ही सुंदरच असते, असे अनुष्का यावेळी म्हणाली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2015 रोजी प्रकाशित
सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीत काम करणार नाही- अनुष्का शर्मा
चेहऱयाचा रंग उजळण्याचा तथाकथित दावा करणाऱया सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीत काम करणार नसल्याचे बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सांगितले आहे.

First published on: 30-07-2015 at 06:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will not endorse fairness products says anushka sharma