‘लाव रे तो व्हिडिओ’मध्ये लवकरच पहायला मिळणार महिला शक्ती…

पुढचे दोन आठवडे या कार्यक्रमात महिला शक्ती प्रदर्शन करणार आहेत

‘लाव रे तो व्हिडिओ’ या कार्यक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं टॅलेंट पहायला मिळतंय. कारण कार्यक्रमाची संकल्पनाच तशी आहे. सर्वसामान्य कलाकार किंवा माणसांनी कौशल्य किंवा त्यांना अवगत असलेली कला एका व्हिडिओमध्ये शुट करुन तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये पाठवले आहेत. हे व्हिडिओ ‘लाव रे तो व्हिडीओ’ या कार्यक्रमामध्ये दाखवले जातात.

घरातल्या घरात व्हिडिओ शुट करुन एका लोकप्रिय वाहिनीवर झळकण्याची ही संधी अनेकांना मिळत आहे. पण आता पुढील दोन आठवडे कार्यक्रमात महिलाशक्तीचं प्रदर्शन होईल.

थोडक्यात राज्यभरातनं इच्छुक मुली, तरुणी आणि महिलांनी आपले टॅलेंट दाखवणारे व्हिडिओ शुट करावेत आणि या कार्यक्रमामध्ये पाठवावेत. तुमचे हे व्हिडिओ पाहून ते योग्य पद्धतीने लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात येतील. राज्यभरातल्या विविध स्तरावरील महिलांमधले गुण, कौशल्य यानिमित्ताने पुढे आणण्याची संधी त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न वाहिनीतर्फे केला जातोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Women special episode of lav re to video avb