WWE सुपरस्टार द रॉक आणि २३ वेळा ऑस्कर नामांकन मिळवणारी अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांच्याबरोबर काम केल्यानंतर आता ‘हा’ अभिनेता सुपरहिरो वंडर वुमन बरोबर काम करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री रिचा चड्ढाचा प्रियकर म्हणून चर्चेत असणारा अली फजल आता हॉलिवूड सिनेसृष्टीत अभिनय करताना दिसणार आहे. फूकरे या बॉलिवूडपटातून नावारुपास आलेल्या अली फजलला हॉलिवूडच्या वंडर वुमन म्हणजेच गल गडॉटबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे.
खरं तर अलीचा हा पहिला हॉलिवूडपट नाही. त्याने याआधी फास्ट अँड फ्युरियस – ७ आणि विक्टोरिया अँड अब्दुल या चित्रपटांमध्ये काम केले आहे. विक्टोरिया अँड अब्दुल या चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती. तब्बल २३ वेळा ऑस्कर नामांकन मिळवणाऱ्या मेरिल स्ट्रीपने देखील त्याच्या जबरदस्त अभिनय शैलीचे कौतुक केले होते. त्यानंतर अली आता तीसऱ्या बिग बजेट हॉलिवूडपटात काम करताना दिसणार आहे.

अली फजलच्या या आगामी चित्रपटाचे नाव डेथ ऑन द नाईल असे आहे. या चित्रपटात वंडर वुमन फेम अभिनेत्री गल गडॉट मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. तसेच केनेथ ब्रेनॉग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

अगाथा ख्रिस्ती कोण आहे?

हा चित्रपट प्रसिद्ध कादंबरीकार अगाथा ख्रिस्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे. अगाथा ख्रिस्ती या लेखिका आपल्या आश्चर्य चकीत करणाऱ्या डिटेक्टिव्ह कथानकांसाठी ओळखल्या जातात. एका लांबलचक कथानकात अनेक लहान लहान कथा रचून शेवटी त्या सर्वांची एक गाठ बांधायची आणि आश्चर्यचकीत करणारा शेवट करायचा. या अजब गजब लिखाण शैलीच्या जोरावर त्यांनी तब्बल ८० वर्ष वाचकांच्या मनावर राज्य केले. अजुनही त्यांच्या पुस्तकांची मोहिनी वाचकांच्या मनावरुन उतरलेली नाही. डेथ ऑन द नाईल हे त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या कादंबऱ्यांपैकी एक आहे. या कथानकावर याआधी नाटक, मालिका आणि चित्रपट तयार करण्यात आले आहेत. या तीनही प्रकारांना ७०-८० च्या दशकात तुफान लोकप्रियता मिळाली होती. डेथ ऑन द नाईल या तीनही प्रकारांचा रिमेक आहे, असे दिग्दर्शक केनेथ ब्रेनॉग यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wonder woman ali fazal gal gadot death on the nile mppg
First published on: 13-09-2019 at 11:12 IST