deepika-mos_041416102752xXx The Return of Xander Cage या आपल्या पहिल्या हॉलिवूडपटामुळे सध्या चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री दीपिकाची चित्रपटातील तिचा नायक विन डिझेलसोबतची छायाचित्रे गाजत आहेत. आता लवकरच तिची क्रीडाक्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तिमत्व आणि चित्रपटातील तिच्या सहकलाकारासोबतची छायाचित्रेदेखील पाहायला मिळतील. या प्रसिध्द व्यक्तिमत्वाचा अभिनयाशी तसा काहीही संबंध नसला तरी या चित्रपटात तो एक पाहुणा कलाकर म्हणून नजरेस पडणार आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, हा आहे ब्राझिलचा प्रसिध्द फुटबॉलपटू नेमार. बॉलिवूड अभिनेत्री दीपिकाच्या xXx The Return of Xander Cage चित्रपटाद्वारे तो आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखविणार आहे. दिपिकाच्या या हॉलिवूडपटात त्याची छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे बोलले जाते. चित्रपटात दीपिका नेमारसोबत स्क्रिन शेअर करताना नजरेस पडेल. ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न ऑफ जेंडर केज’ चित्रपटाचे शुटिंग संपवून दीपिका गेल्या आठवड्यात भारतात परतली. जगातील बेस्ट स्ट्रायकरमध्ये समावेश होणाऱ्या नेमारने यावेळी अभिनय क्षेत्रात हात आजमावून पाहाण्याचे ठरविल्याचे सुत्रांकडून समजते. चित्रिकरणाच्या स्थळी नेमारला पाहून उपस्थितांमध्ये जोश निर्माण झाला होता. या चित्रपटाचा भाग बनल्याने आपल्याला खूप उत्साहवर्धक वाटत असल्याचे नेमारने एका पोस्टद्वारे म्हटले आहे. या छोट्याशा भूमिकेत आपण विन डिझेलच्या हातून मारलो जात असल्याचेदेखील त्यांने म्हटले आहे. निर्मिती अवस्थेत असलेला हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होईल. चित्रपटाचा पहिला ट्रेलर २२ जुलै रोजी प्रदर्शित होईल.