अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ ही काही गाजलेल्या ऑनस्क्रिन जोड्यांपैकी एक जोडी. ‘युवराज’, ‘मैने प्यार क्यू किया’, ‘एक था टायगर’ यांसारख्या हिट चित्रपटांतून सलमान आणि कतरिना ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकली होती. त्यांच्यातले नाते सहकलाकारांपलीकडले असल्याच्या चर्चांनाही मध्यंतरी उधाण आले होते. सलमान आणि कतरिनाला पडद्यावर आणि पडद्यामागेसुद्धा रसिकांनी नेहमीच पसंत केले आहे. पण गेला काही काळ या दोन्ही कलाकारांनी स्क्रिन शेअर केली नव्हती. पण आता एका चित्रपटाच्या निमित्ताने भाईजान सलमान आणि कॅट पुन्हा एकदा येणार आहेत.
‘बकरी ईद’च्या निमित्ताने यशराज फिल्म्सतर्फे ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा पहिला लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. यशराज फिल्म्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टीही जाहिर करण्यात आल्या आहेत. याआधी ‘एक था टायगर’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सलमान खान आणि कतरिना यांनी कबीर खान यांच्या दिग्दर्शनात काम केले होते. सलमानने साकारलेल्या टायगरला सिनेरसिकांनी प्रचंड दाद दिली होती. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर कबीर खान आणि सलमान खान यांच्या जोडीने ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते.
कबीर खानच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटानेही बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असून या चित्रपटाचे दिग्दर्शनही कबीर खानच करत आहे.
नव्याने येणाऱ्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार असल्याचे या ट्विटमधून सांगण्यात आले आहे. भाईजानच्या एकामागून एक येणाऱ्या चित्रपटांसाठी चाहत्यांमध्ये कमीलीची उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाचे कथानक आणि इतर माहिती अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. पण पुढच्या वर्षीच्या ख्रिसमसमध्ये सलमानचा ‘टायगर’ पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार हे नक्की झाले आहे.
Announcing @BeingSalmanKhan and #KatrinaKaif in #TigerZindaHai
Directed by @aliabbaszafar Releasing Christmas 2017 pic.twitter.com/lSlm109KkH— Yash Raj Films (@yrf) September 13, 2016
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.