इंटरनेट आणि त्यामुळे उपलब्ध झालेल्या विविध माध्यमांमुळे मानव जातीसाठी बऱ्याच गोष्टी सुकर झाल्या. पण, काही बाबतीत मात्र या साधनांचा चुकीचा वापर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आलं हे जरी खरं असलं तरीही एका क्षणात याच इंटरनेटमुळे होत्याचं नव्हतं झाल्याचंही पाहायला मिळतं. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला सध्या असाच अनुभव आल्याचं पाहायला मिळतंय. ‘ये है मोहोब्बते’ फेम दिव्यांका त्रिपाठीच्या मृत्यूच्या अफवांनी सोशल मीडियावर अनेकांनाच धक्का दिला होता. अखेर खुद्द दिव्यांकानेच ट्विट करत ही सर्व गोंधळाची परिस्थिती सावरुन नेण्याचा प्रयत्न केला.
आपल्या मृत्यूच्या अफवा पसरल्याचं पाहून दिव्यांकाने ट्विट केलं, ‘कोणीतरी माझं निधन झाल्याचं खोटं वृत्त पसरवतंय. तसं काही नाहीये, मी जिवंत आहे. कृपा करुन अशा अफवांमुळे माझ्या मित्रपरिवारासमोर कोणत्याही प्रकराच्या अडचणी उभ्या करु नका’, असं दिव्यांकाने ट्विटमध्ये लिहिलय. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दिव्यांकाने या गोँधळाच्या परिस्थितीबद्दल तिचं मत मांडलं. ‘काही लोक उगाचच अफवांवर विश्वास ठेवून माझ्या कुटुंबियांना फोन करुन माझा अपघात झाल्याचं सांगत आहेत. अपघातात माझा मृत्यू झाल्याचं म्हणत आहेत. किंबहुना त्यामुळे मला बऱ्याचजणांचे फोनही येऊन गेले. त्यामुळेच मी आता जाहीरपणे सर्वांच्या नावे एक संदेश दिला आहे की, कृपा करुन अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका’, असं तिने स्पष्ट केलं.
Someone's spreading news about me being in #RIPmode. Guys I'm very much alive. Please don't trouble my friends and family with such rumours.
— Divyanka T Dahiya (@Divyanka_T) September 1, 2017
वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर
दिव्यांकाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन आपण अगदी ठीक आल्याचं सांगत खरी परिस्थिती चाहत्यांसमोर मांडली. स्टार वाहिनीर प्रदर्शित होणाऱ्या ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेतून दिव्यांका त्रिपाठी हे नाव घराघरात पोहोचलं. तिच्या ‘इशिता भल्ला’ म्हणजेच ‘इशी माँ’ या भूमिकेला अनेकांनी दाद दिली. या कार्यक्रमासोबतच दिव्यांका ‘नच बलिये’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. इतकच नव्हे तर, या कायर्क्रमाचं जेतेपदही या जोडीनेच पटकावलं होतं.