गेल्या काही दिवसांपासून गायक मिका सिंगच्या ‘क्वारंटाइन लव्ह’ची चर्चा सुरु आहे. मिका अभिनेत्री चाहत खन्नाला डेट करत असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अशातच चाहतची बहिण सिमरन खन्नादेखील चर्चेत आहे. या चर्चा सिमरनने पति भरत दुदानीला घटस्फोट दिल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

नुकताच सिमरनने ‘स्पॉटबॉय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ‘हो, मी आणि भरतने घटस्फोट घेतला आहे. आमच्यामध्ये काही भांडणे नाहीत’ असे म्हटले आहे. सिमरन आणि भरतला एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचे नाव विनीत आहे.

‘भरतला विनीतची कस्टडी मिळाली आहे. पण मी त्याला आधूनमधून भेटत जाईन. मी आणि भरतने विभक्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी आमच्यात कोणत्याही प्रकारचे भांडण नाही’ असे सिमरनने म्हटले आहे.

सिमरनने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये काम केले आहे. या मालिकेतील तिची गायत्री गोयंका उर्फ गायूची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. त्याच बरोबर तिने ‘परमावतार श्री कृष्ण’, ‘कृष्णाबेन खकरावाला’ आणि ‘उडानः सपनो की’ या मालिकांमध्ये काम केले आहे.