VIDEO: ‘चीज बडी है मस्त मस्त’चं हे व्हर्जन ऐकलं का?

‘शेप ऑफ यू’ आणि ‘चीज बडी है मस्त मस्त’चं मॅशअप तुम्हाला नक्कीच थिरकायला भाग पाडेल

vidya
विद्या वॉक्स

युट्यूब हे नव्या जोमाच्या कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळवून देणारं एक हक्काचं व्यासपीठ झालं आहे. इथे तुमच्या कलेच्या बळावरच प्रसिद्धीचे निकष ठरवले जातात. अशा या कलाकारांच्या नव्या दुनियेत गेल्या दोन वर्षांपासून ‘विद्या वॉक्स’चं नाव बरंच चर्चेत आहे. विविध हॉलिवूड, बॉलिवूड गीतं, अल्बममधील गाणी स्वत:च्या आवाजात गात, त्यांचं नवं व्हर्जन सादर करत विद्या तिच्या युट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ पोस्ट करते. तिची बरीच गाणी अनेकांच्या प्लेलिस्टचा भागही आहेत. नुकतंच तिने सादर केलेलं ‘शेप ऑफ यू’ आणि tu cheez badi hai mast ‘चीड बडी है मस्त’चं मॅशअप व्हर्जन प्रचंड चर्चेत आलं आहे.

प्रसिद्ध पॉप स्टार एड शीरनच्या सुपरहिट ‘शेप ऑफ यू’ या गाण्याला ‘मोहरा’ चित्रपटातील ‘चीज बडी है मस्त..’ या गाण्याची जोड देत विद्याने हे गाणं सादर केलं आहे. या गाण्याची चाल त्याला मिळालेली व्हायोलिनची साथ यांमुळे गाण्याला ‘चार चाँद’ लागले आहेत. या गाण्यासाठी विद्याच्या गायनशैलीसोबतच शिवा राममूर्तीच्या व्हायोलिन वादनाचीही प्रशंसा केली जात आहे.

vidya vox विद्या सध्याच्या घडीला आघाडीच्या युट्यूबर्सपैकी एक आहे. यंदाच्या युट्यूब फॅन फेस्टमध्येही तिच्या उपस्थितीने चाहत्यांची मनं जिंकली होती. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या अक्कीपर्यंत हे गाणं नक्कीच पोहोचेल असा अंदाज अनेकांनीच वर्तवला आहे. तिचं हे व्हायरल होणारं मॅशअप साँग आता खिलाडी कुमार ऐकणार का? हे गाणं ऐकल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल हे, पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मशिन’ या चित्रपटातूनही ‘चीज बडी है मस्त मस्त’चं रिक्रिएटेड व्हर्जन सादर करण्यात आलं होतं.

वाचा: जस्टिनमागोमाग भारत भेटीला येणार एड शीरन

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: You tube sensation singer vidya vox presents shape of you and cheez badi hai brand new mashup version is going viral