यूट्यूबवर जीतू जान नावाने लोकप्रिय असणारा यूट्यूबर जितेंद्रला अटक करण्यात आली आहे. भांडूप पोलिसांनी जितेंद्रला पत्नी कोमल अग्रवाल हिच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच यूट्यूबर जितेंद्रची पत्नी कोमल अग्रवाल हिचा अपघाती मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. पण कोमलच्या कुटुंबियांनी तिचा पती जितेंद्र विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोमलच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर यूट्यूबर जितेंद्रला अटक करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये जितेंद्रने कोमलची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जितेंद्रविरोधात आयपीसी (भादंवि) कलम २०४, कलम ३२३, कलम ३०६ आणि कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.

कोमलची बहिण प्रिया आणि आईने दिलेल्या माहितीनुसार, जीतू घरातील कामांमुळे पत्नीला मारहाण करत असे. जितेंद्र हा मुंबईतील अतिशय लोकप्रिय यूट्यूबर आहे. तो सोशल मीडियावर जीतू जान नावाने ओळखला जातो. त्याचे यूट्यूबवर जवळपास २ लाख सब्सस्क्रायबर आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtuber jeetu jaan arrested over alleged murder of wife avb
First published on: 02-06-2021 at 11:52 IST