क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री, मॉडेल हेजल किच नुकतेच विवाहबंधनात अडकले. युवराजने आपल्या इन्स्टाग्रामवरुन लग्नसोहळ्यातील पहिला फोटो शेअर केल्यानंतर आता लग्नानंतरचा युवी-हेजलचा पहिला फोटो समोर आला आहे.  यामध्ये युवराज आणि हेजल एकमेकांना बिलगून बसल्याचे दिसते. युवराज- हेजल यांचा हा फोटो विशेष लक्ष वेधणारा असा आहे. युवराज-हेजलच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. त्याच्या लग्नाला कोणाला आमंत्रण देण्यात आले आहे इथपासून ते लग्नाच्या दिवशी हे जोडपे काय परिधान करणार आहेत याबद्दलही चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती. अखेर अपेक्षेप्रमाणे शाही थाटात युवी-हेजलचा विवाह सोहळा पार पडला. वेगवेगळ्या परंपरेनुसार युवी-हेजल विवाहबंधनात अडकले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्यभराच्या पार्टनरशिपसाठी युवीने हेजलची निवड केली होती. बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबत एकत्र वेळ घालविल्यानंतर युवराज आणि हेजल यांनी काही दिवसांपूर्वी गुपचूप साखरपूडा केला होता. साखरपुडा झाल्यानंतर युवराज पुढील वर्षी लग्न बेडीत अडकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण युवी त्याच्या वाढदिवाच्या पूर्वीच हेजलला आपल्या घरी घेऊन आला आहे.  युवराज-हेजल यांची मेहंदी सिरेमनी (प्री-वेडिंग पार्टी) २९ नोव्हेंबरला चंदिगड येथील ललित हॉटेल येथे पार पडली होती. ३० नोव्हेंबरला शीख विवाह पद्धतीनुसार लग्न झाल्यानंतर या दोघांकडून रात्रीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर २ डिसेंबरला युवराज-हेजलने गोवा येथे हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केले. ५ डिसेंबरला युवराज-हेजल दिल्लीमध्ये छत्तरपूर येथील फार्महाऊसवर संगीत पार्टीचे आयोजन केले होते. त्यानंतर बुधवारी दिल्लीत त्यांचे रिसेप्शन झाले. यावेळी क्रिकेट आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध चेहरे उपस्थित होते. तीन राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने पार पडलेल्या विवाहसोहळ्याचे  युवी-हेजल यांचे अप्रतिम क्षण बाझार ब्राइडने शेअर केले आहेत.

दरम्यान, युवराज आणि हेजल या दोघांचे प्रेम फुलत असताना काही काळासाठी त्यांच्यात दुरावाही निर्माण झाला होता. हेजलने युवीचा फोन उचलणे बंद केले होते. हेजलचा प्रतिसाद मिळत नसल्याने युवीने तिला फेसबुक फ्रेंडलिस्टमधून देखील बेदखल केले होते. पण अखेर दोघांमधील वाद मिटला आणि आता ते सुखाने संसाराला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj singh hazel keech first pictures after wedding are giving us the feels see pics and videos
First published on: 08-12-2016 at 14:25 IST